सहजच एकदा मागे वळून पहिल
आयुष्याची काही पान गळून पडली होती
सुख जवळ दुःख येवून दूर जातच होती
तर आयुष्याची अंतिम घडी जवळ येवून ठेपली होती
त्यातल एक पान होत मैत्रिच
आयुष्यभर साथ देणार या खात्रीच
म्हणत मी तुझ्याकडून काहीच नाही घेणार
फ़क्त तुला मी भरभरून देणार
त्यातल एक पान होत आत्मविश्वासाच
त्यात बरीच काही होती अपूर्ण आश्वासन
पूर्ण करीन मी ही सारी आश्वासन
जगत आहे आयुष्य ह्या एकाच विश्वासान
त्यातल एक पान होत आयुष्याच
त्यापुढे माझ सार आयुष्य मुकल होत
आयुष्य हे असच जगायच असत
हे आता मला कळून चुकल होत
त्यातल एक पान होत प्रेमाच
आपण फ़क्त प्रेम प्रेम प्रेम करत रहयाच
प्रेम म्हणजे प्रेम असत
तुमच आमच सेम असत
लोड होत आहे...